Monday, September 12, 2011

दहशतवाद विरोधी लढाई आणि अमेरिका


अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अल कायदा या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्याला आता दहा वर्षे झालीत. 2001 पूर्वीही या जगात दहशतवादी हल्ले झाले. मात्र त्याचे बहुतेक उद्देश हे स्थानिक होते. एखादी राजवट उलथवून टाकणे,  तत्कालीन घटनेचा बदला घेणे किंवा एखादा प्रदेश बळकावणे हाच या दहशतवादी हल्लायांचा उद्देश होता. मात्र 9/11 च्या हल्ला हा ख-या अर्थाने जागतिक स्वरुपाचा होता.

                  सौदी अरेबिया तसेच वेगवेगळ्या मुस्लीम देशांत अमेरिका करत असलेल्या हस्तक्षेपाच्या विरोधात ओसामा बिन लादेन या कडव्या दहशतवाद्यांने आपल्या अल-कायदा या दहशतवादी संघटनेच्या माध्यामातून ( ज्या संघटनेत पाकव्याप्त काश्मिर पासून ते पाकिस्तान, अफगाणिस्तान. सौदी अरेबिया, येमेन यासह काही आशियाई आणि आफ्रिकन दहशतवाद्यांचा समावेश होता. ) थेट अमेरिकेवर हल्ला चढवला. 20 व्या शतकात अमेरिकेनं अनेक युद्ध खेळली. मात्र पर्ल हर्बरवर वर जपानने केलेल्या हल्ल्याचा अपवाद सोडल्यास अमेरिकन भूमीला प्रत्यक्ष युद्धाची झळ बसली नव्हती. त्यामुळे 21 व्या शतकाच्या सुरुवातीला थेट अमेरिकेच्या गंडस्थळावर झालेल्या हल्ल्यानं संपूर्ण जगभर खळबळ उडणे स्वाभाविक होते. त्या काळातील अमेरिक अध्यक्ष जॉर्ज बूश आणि इतर नेत्यांची वक्तव्य वाचली तर अमेरिकेचा या हल्ल्यानं सपशेल गोँधळ उडाला होता हे सहज लक्षात येते.

               अमेरिकेच्या साम्राज्याला आव्हान देणा-या या हल्ल्याचा बदला अमेरिकेनं अगदी त्यांच्या स्टाईलने घेतला.  प्रथम अफगाणिस्तानवर हल्ला चढवला. तालिबाननांना अफगाणिस्तानच्या बाहेर हुसकावून लावण्यात अमेरिका तेंव्हा तरी यशस्वी झाली. हाच युद्धज्वर कायम ठेवत बूश प्रशासनाने इराकवर हल्ला चढवला. इराकमधली सद्दाम राजवट संपुष्टात आली. सद्दाम हुसेनला प्रथम पकडण्यात आणि नंतर फासावर लटकवण्यात अमेरिकेला यश आलं. याच वर्षी मे महिन्यात ओसामा बिन लादेनला ठार मारुन अमेरिकेनं दहशतवाद विरोधी लढ्यातला एक मोठा टप्पा पार केलाय. अफगाणिस्तान आणि इराक जिंकले, सद्दाम आणि ओसामाला ठार मारले तरीही अमेरिकेला या  लढाईत निर्णायक यश आलेले नाही.

             दहशतवादाला मदत करणा-या प्रत्येक शक्तीविरुद्ध, देशांविरुद्ध अमेरिका युद्ध पुकारत आहे. असं दहा वर्षांपूर्वी जॉर्ज बूश यांनी जाहीर केलं होतं. मात्र त्यांच हे युद्ध अफगाणिस्तान, इराक आणि काही अंशी पाकिस्तान इतपतचं मर्यादीत राहिलं.  इराण, सीरिया, लेबनॉन, पॅलिस्टाईन या देशातूनही  दहशतवाद्यांना पाठिंबा मागच्या दशकात मिळतचं राहिला. मात्र त्या देशांविरुद्ध अमेरिकेनं कोणतीही लष्करी कारवाई केली नाही.

             अमेरिकेविरुद्धच्या युद्धात  आपण जिंकणार नाही याची खात्री ओसामाला नक्कीच होती. मात्र अमेरिकन नागरिकांना अस्वस्थ करण्यात, अफगाणिस्तान, इराक यासारख्या मुस्लीमबहुल देशात अमेरिकेला युद्ध लढायला लावण्यात तो यशस्वी झालाय.या युद्धामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण झाला, दोन हजार पेक्षा जास्त अमेरिका आणि दोस्त राष्ट्रांचे सैनिक मारले गेले तरीही अमेरिकेला इराक आणि अफगाणिस्तानवर निर्णायक यश मिळवता आलेलं नाही. या वर्षाखेरिस अमेरिेकेचे सैन्य इराकमधून बाहेर पडेल त्यानंतर इराकमध्ये  यादवी युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तसेच 2014 मध्ये  नाटोच्या सैन्यानी  अफगाणिस्तानमधून आपले समान पॅक केल्यानंतर तिथली लोकशाही राजवट कितपत तग धरु शकेल ?

        शीतयुद्धाच्या वेळी अमेरिकेसमोर सोव्हियत रशिया हा एक ठोस शत्रू होता. सोव्हित रशिया आणि सोव्हियत संघराज्यातील राष्ट्रे अशा आघाडीविरुद्ध लढयाचे आहे याची माहिती होती. मात्र या दहशतवाद विरोधी लढाईत तसे नाही. या लढाईत नेमका शत्रू कोण हे अमेरिकेला अजूनही ठरवता आलेलं नाही. ही दहशतवाद विरोधातली लढाई आहे असे जॉर्ज बूश यांनी जाहीर केलं होतं. इस्लामी दहशतावाद्यांनी अमेरिकेवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेणे आणि संभाव्य हल्ल्यापासून अमेरिकेचे रक्षण करणे हा अमेरिकेचा उद्देश होता. परवा सद्दाम हुसेन आणि इराक  काल ओसाम बिन लादेन आणि अलकायदा अमेरिकेचे या लढाईतले  शत्रू होते. हे शत्रू तर मारले गेलेत. मात्र तरीही अमेरिकेचे भय संपलेले नाही. हमास, हिजबूल्लाह आणि इराण हे अमेरिकेचे जूने शत्रू हे 9/11 पेक्षा आज अधिक सशक्त झालेत. हमासचे गाझा पट्टीवरचे वर्चस्व कायम आहे. येत्या निवडणुकीतही पुन्हा एकदा हमास जिंकण्याची शक्यता आहे.  हिजबूल्लाहचे लेबॉनॉनवरची पकड आणखी घट्ट झालीय. तर अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणनं आपली लष्करी शक्ती वाढवलीय इराण बहुधा अण्वस्त्र सज्जही झालाय.

         या जुन्या शत्रूंबरोबरच आणखी एका  शत्रूची चिंता आता अमेरिकेला करावी लागणार आहे ती म्हणजे पाकिस्तान. गेल्या 60 वर्षात अमेरिकेच्या मदतीवर आपले अर्थकारण चालवणा-या देशातली बहुस्ंख्य जनता आज अमेरिकेच्या विरोधात आहे. 20 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला पाकिस्तान आज जागतिक दहशतवादाचे नंदनवन आहे. संपूर्ण जगभरात चाललेल्या दहशतवादी कारवायांचे कोणते ना कोणते कनेक्शन पाकिस्तानशी जोडलेले असते. अस्थिर सरकार, मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था, राजकीय महत्वकांक्षा असलेले लष्कर, आणि जिहादी कारवाई करण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असलेली धर्मांध जनता ही जागतिक विद्धवंसाला कारणीभूत ठरु शकेल अशी सूपीक परिस्थिती पाकिस्तानात आहे.

           त्यामुळे आज 9/11 ऩंतर दहा वर्षांनी कदाचित अमेरिकेचा भूभाग अधिक सुरक्षित झाला असेल. मात्र ज्या पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियाई भागात अमेरिका ही लढाई लढत आहे त्या ठिकाणी अमेरिकेची परिस्थिती अधिकच अवघड होऊन बसलीय. जगातली एकमेव महासत्ता होण्याच्या महत्वकांक्षेनं झपाटलेल्या अमेरिकेसाठी ही परिस्थिती नक्कीच अभिमानास्पपद नाही. आपल्या स्वार्थासाठी राजकीय रंगमंचावर वाटेल तशी टोपी फिरवणे आणि अगदी कोणत्याही स्तराला जाण्याची नेहमीच तयारी असणा-या अमेरिकेच्या आजवरच्या धोरणामुळेच या देशावर ही परिस्थिती ओढवली आहे.

                संकट आली की त्यामधून उसळी मारयची आणि आपल्या शक्तीशाली सामर्थ्यानं जगाचे डोळे दिपून टाकयचे हा अमेरिकेचा आजवरचा इतिहास आहे. 19 व्या शतकातील अमेरिकन यादवी, 1929 ची महामंदी, दुसरे महायुद्ध, कोल्ड वॉर यासारख्या प्रत्येक घटनांमध्ये ह्या 'ग्रेट अमेरिकन पॉवर' चे दर्शन जगाला झाले आहे. आता आपल्या पल्लेदार भाषणांमधून Yes We Can चा नारा देत अमेरिकेचे अध्यक्ष बनलेले बराक ओबामा पुन्हा एकदा या 'ग्रेट अमेरिकन पॉवर' चे दर्शन जगाला घडवून देतात का हा खरा प्रश्न आहे.
          

14 comments:

Niranjan Welankar said...

चांगला आहे, पण फार विशेष नाही वाटला. काही माहिती छान दिली आहे. एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे अमेरिका, हाच जगातला सर्वांत मोठा दहशतवादी देश आहे.

santosh gore said...

अमेरिका हा फक्त आपलाच स्वार्थ पाहणारा देश आहे. त्यामुळे त्याला पाकिस्तानही प्रिय वाटतो. मात्र गरज पडल्यावर तो पाकिस्तानात लपलेल्या ओसामाचीही दाढी ओढून समुद्रात कबर खोदतो. हे लक्षात ठेवा.

Gireesh Mandhale said...
This comment has been removed by the author.
Gireesh Mandhale said...

First of all this face of America is what is made public or what we get to see in media and newspapers. But what is in background??
There are people who claim that 9/11 attack was organized by America itself and not Osama Bin Laden or Al Qaeda. I don't understand how two 110 story buildings totally collapse when Planes(or whatever) hits them above 75-80 floors. There are many videos/documentaries out there about this.
When Saddam was captured and identified, it was shown on all media but why not in the case of Laden?

I agree with Niranjan's comment that America is the biggest terrorist. It just follow the path of their own interest. Otherwise why don't we get any help from America under "War against Terrorism" program when there are bomb blasts going on in India on almost regular basis ?

Basically, America is a country whose economy runs on War, that's it. Everything else is fake.

Onkar Danke said...

@ ऩिरंजन, अमेरिका हा एक दहशतवादी देश आहे हे खरे आहे. मात्र सर्वात मोठ्या दहशतवादी देशाचा मान किमान सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी पाकिस्तानला द्यायला हवा. अमेरिकन मदतीवर वाढलेलं हे अमेरिकेच पिल्लू आता अमेरिकेपेक्षाही अधिक दहशतवादी बनले आहे.

प्रतिक्रीयेबद्दल आभार

Onkar Danke said...

@ संतोष, अमेरिका हा आपला स्वार्थ पाहणारा देश आहे. हे अगदी खरे आहे. प्रत्येक देशाने आपला स्वार्थ हा पाहयला हवा. मात्र आपला स्वार्थ साधण्यासाठी जागतिक शांतता, जगातली आर्थिक,सामाजिक, धार्मिक परिस्थिती यावर किती फरक पडतो याचाही विचार प्रत्येक देशांनी करणे आवश्यक आहे.
मागच्या दहा वर्षात अमेरिकनं आपल्या स्वार्थासाठी जगावर दोन युद्ध लादली. तरीही अमेरिकेच्या समस्या कमी झालेली नाहीत. त्यामुळे अमेरिकेचा स्वार्थ पूर्ण करण्याची मोठी किंमत जगाला मोजावी लागू शकते.

Onkar Danke said...

@ गिरीश इतक्या सविस्तर आणि अभ्यासू प्रतिक्रियेबद्दल सर्वप्रथम धन्यवाद.

9/11 च्या हल्ल्याबाबत वेगवेगळ्या थियरी मांडल्या जातात. मात्र याबद्दल कोणती थियरी 100 टक्के बरोबर आहे हे सांगण्याइतका माझा अभ्यास नाही. तसेच याबाबतचा माझ्याकडे पुरावाही नाही. त्यामुळे पुरावा नसताना ब्लॉग सारख्या जबाबदार माध्यमातून मी कोणतीही थियरी मांडणे टाळले आहे.

दहशतवादाच्या विरोधात अमेरिका भारताला मदत करत नाही हे दुट्टपीपणाचे आहे अगदी मान्य. मात्र भारत-अमेरिका संबंधाचा गेल्या 60 वर्षातला इतिहास, पाकिस्तानची तालिबान विरोधी लढाईत लागणारी भू राजनैतीक गरज पाहता अमेरिका भारताला फारशी मदत करणार नाही हे उघड आहे. त्यामुळे अमेरिकेच्या मदतीवर अवलंबून राहिल्यापेक्षा आपण आपली लढाई स्वत:च्या बळावर लढणे आवश्यक आहे. अमेरिका आपल्या स्वार्थ साधण्यासाठी आपली टोपी फिरवते त्या कलेचा भारतानेही अवलंब करायला हवा. अमेरिकेकडे डोळे लावून बसणे योग्य नाही.

अमेरिकेची त्यांची अर्थव्यवस्था ही युद्धावर आधारित आहे हा तुझा मुद्दा 100 टक्के मान्य.
पुन्हा एकदा सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आभार

Niranjan Welankar said...

जोरदार!! एखाद्या साप्ताहिक कट्ट्यावरच्या चर्चेचं स्वरूप ब्लॉगला आलं आहे.... मस्त. खरं तर हा विषय खूप मोठा आहे, तरीही चर्चेत थोडा सहभाग घेतो.

पाकिस्तान दहशतवादी आहेच, पण पाकिस्तानची औकात नाही. तो अत्यंत दरिद्री व भंकस देश आहे. गंमत म्हणजे तो दहशतवाद त्यांच्या आकांद्वारे स्पॉन्सर आहे आणि हे आका- सौदी बडे धेंडं आणि अमेरिकन आहेत, जे स्वत: एकमेकांचे विरोधक आहेत. असा काहीसा बूमरँगसारखा प्रकार आहे.

तसंच, अमेरिका काही बाबतीत पाकिस्तानप्रमाणे आहे. म्हणजे दहशतवादीही आहे आणि दहशतवादाचा बळी आणि रक्षकसुद्धा आहे. फक्त त्याची ताकत पाकिस्तानपेक्षा लाख पट अधिक आहे. तसंच तो एका बाजूला चीनप्रमाणेही आहे. म्हणजे बलाढ्य आहे, पण जसा चीन अंतर्गत बाबींमुळे कमकुवत होतोय (किंवा होईल असा अंदाज आहे), तसा अमेरिकासुद्धा दिवाळखोरी व अस्थिरतेच्या मार्गावर असल्यासारखा दिसतो. तरीसुद्धा अमेरिकेची ताकत अत्यंत महान आहे, मोठी व प्रचंड आहे.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत ब्रिटनने जागतिक सत्तासंतुलनाची जी भुमिका (ब-या वाईट) प्रकारे पार पाडली होती, ती अमेरिका पार पाडत आहे. अनेक गुणदोषांसह.

अमेरिकेच्या दहशतवादाची तीन अंग आहेत- अमेरिकन संस्कृती, अमेरिकन कंपन्या आणि अमेरिकन मीडिया. ह्या सर्वांचा आज सर्व जगाला विळखा बसला आहे, किंबहुना जग त्यांच्या ताब्यात आहे, त्यांच्या नियंत्रणातच आहे.

असं असलं तरीही अमेरिकेचा इतिहास काही बाबतीत चांगला आहे. एके काळी अमेरिकेची चांगली ओळख होती- कोणत्याही देशावर हल्ला न केलेला देश, सर्वांना सामावून घेणारा देश, लोकशाही प्रधान व युद्धात भाग न घेणारा देश. त्यामुळे आजही सर्वच वाईट असं म्हणता येत नाही.

आज खरं गरज आहे इतर गोष्टी बाजूला ठेवून फक्त देशाचं हित पाहण्याची व नेताजींच्या दृष्टीची. पण आजचे दरिद्री व भणंग नेते- दिग्गीबाबा, राहुलबाबा इत्यादि अत्यंत टुकार आहेत. एक वेळ अण्णा परवडले. अंगात चांगली मस्ती व धमक तरी आहे. पण बाकी अंधार आहे.

गिरीश म्हणाला त्याप्रमाणे समोर न येणा-या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. कारण आज जे काही सत्य सांगितलं जातं, ते फक्त सरकारी प्रोजेक्शन आहे. ते खरं असेलच असं नाही. त्यामुळे ब्लॉग ह्या जवाबदार व सक्षम माध्यमातून बाहेर न येणा-या गोष्टी, वेगवेगळे डायनॅमिक्स, अंधारातील बाजू समोर याव्यात. धन्यवाद...

pmvaria said...

nice post sir....

pmvaria said...

nice post sir..

Onkar Danke said...

@ परीक्षित, धन्यवाद मित्रा

दीपक पळसुले said...

sir nice 1 articles....

Onkar Danke said...

धन्यवाद दीपक. ब्लॉगवर स्वागत

Shrijeet said...

U.S president kennedy once said about the dictator of one of the states that 'Although he is a bastered but he is our bastered'

if this statement is read with the book DIPLOMACY penned by henry kissinger we would come to conclusion that america is very very vivid about national interests

but onkar i would like to attarct ur attention to the internal politics of europe as well as america

america has sunk today in identity crisis as u know americans have have a official lobbying act which is interconnected with the development of asian power and internal white-black population imbalance especilly a flood of asians in america and europe is increasing day by day in europe as well as america therefore america is desperate to wipe out all its enimies at the earliest possible instance.Hence the fast moves on u.s part are just to expedite their mission before other civilisations take over their agenda

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...