Wednesday, November 11, 2009

.... नाठाळाच्‍या माथी हाणू काठी !!!


मी मनसेचा समर्थक नाही. राज ठाकरेंचा फॅन नाही.मराठीचा दुराभिमानी नाही. लोकशाहीच्या मंदिराचा आदर ठेवला पाहिजे. विधानसभा हे चर्चेचे व्यासपीठ आहे. हे सारे मला पटते. तरीही मनसेच्या आमदारांनी अबु आझमीला जो चोप दिला त्याला माझे समर्थन आहे.


या प्रकरणात ज्या व्यक्तीला चोप देण्यात आलाय.तो अबु आझमी हा अत्यंत मस्तवाल माणूस आहे.(मला मान्य आहे की लिखानाचे संकेत जपण्याकरता अबु आझमींचा उल्लेख आदरपूर्वक करायला हवा.परंतु अबु आझमीला आदरआर्थी लिहण्यासाठी माझे बोट काही वळत नाही..सॉरी ) अबु आझमीवर मुंबई बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचे आरोप झाले. अनेक प्रक्षोभक आणि धार्मिक तेढ भाषणे करण्याचा त्याचा रेकॉर्ड आहे. त्याच्या मुलाला कोकेन घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले होते. हे सारे करताना त्याला कधीही भारतीय राज्यघटना, महान परंपरा याची आठवण आली नाही. आता मात्र आपल्या स्वार्थासाठी त्याला राज्यघटनेतील कलमांची आठवण होतेय.


तेरा वर्षापूर्वी अबु आझमीच्या समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेश विधानसभेत शपथ घेऊ द्यावी याकरता राडा केला होता. हे आज सर्वजण विसरले आहेत. तेरा वर्षापूर्वी त्यांना हिंदू- मुस्लिम अशी तेढ निर्माण करायची होती. आज या पक्षाला मराठी -हिंदी भाषिक यांच्यात फाळणी करायची आहे.सिमी सारख्या दहशतवादी संघटनेला पाठिंबा देणारे समाजवादी पक्षाचे नेते हेच आजचे भिंद्रनवाले आहेत.हा इतक्या कलंकीत पार्श्वभूमी असलेला अबु आझमी निवडून कसा येतो याचेच खरे आश्चर्य आहे.लोकशाही राजवटीतल्या सर्व मर्यादांचा अत्यंत खुबीने वापर करत अबु सारखे हे आमदार निवडून येतात. ते ही एक नाही तर दोन विधानसभा मतदारसंघातून..देशातल्या प्रत्येक समजदार व्यक्तींनी याचा खरेच गंभीरपणे विचार करायला हवा.


अबु आझमी २० वर्षे इथे रहात आहे, २ का ३ वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. त्यांची मातॄभाषा हिंदी आहे. मराठी व हिंदीची स्क्रिप्ट सारखीच म्हणजे देवनागरी असल्याने त्यांना समस्त महाराष्ट्रीय जनतेचा आदर ठेवण्यासाठी "४ ओळी" मराठीत वाचणे जड होते का ? परंतु नाही....राज ठाकरेंच्या 'मराठी खतरेमे ' या ना-याला तेवढ्याच तडफेने उत्तर द्यायचे असेल तर हिंदीच्या आग्रहाची अडेलतट्टू भूमिका घेतली पाहीजे. हे या अबु आझमीला बरोबर माहित आहे. एक मुस्लिम आमदार हिंदीचा कैवार घेतो. हा नवीन प्रतिमा अबुने आता बनवली आहे. अबु आझमीच्या भावी राजकीय काराकिर्दीसाठी ही प्रतिमा नक्कीच उपयोगी पडणार आहे.

अबु प्रमाणे अन्य काही आमदारांनी अन्य भाषेत शपथ घेतली. काहींनी इंग्रजी, काहींनी हिंदी काहींनी संस्कृत भाषेत शपथ घेतली. परंतु त्यांच्या शपथ घेण्याच्या उद्देशात कोणता मस्तवालपणा नव्हता.त्यामुळे त्यांना मनसेने कोणताही विरोध केला नाही हे योग्य झाले. माझाही विरोध हिंदी किंवा अन्य भाषेत शपथ घेण्यास नाहीय..तर अबु आझमींच्या मस्तवालपणाला आहे.


या संपूर्ण प्रकरणात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारची भूमिकाही संशयास्पद होती.राज ठाकरे ह्यांनी दिलेले आव्हान आणि त्याला अबु आझमीने दिलेले प्रतिआव्हान ह्यामुळे हे सर्व प्रकरण पेटणार याची कल्पना सर्वांना होती. तरीही तडजोडीचे कोणतेही प्रयत्न सरकार दरबारातून करण्यात आले नाहीत.यापूर्वी अनेकदा विधानसभेत मार्शल बोलवण्यात आले आहेत. सोमवारी ही खबरदारी का घेण्यात आली नाही. मनसेच्या काठीने अबु आझमीचा साप ठेचण्याची सरकारची योजना होती ?


विधानसभेत राडा करणा-या मनसे आमदारांना शिक्षा ही व्हायलाच हवी. परंतु त्यांना चप्पल दाखवणा-या अबु आझमीला मोकळे का सोडण्यात आले. ? अबु आझमीने बाळासाहेबांच्या विरोधात प्रक्षोभक विधान केलं.त्याच्या समर्थकांनी भिवंडीमध्ये बसेस फोडल्या.याबाबत गुन्हा नोंदवणे सोडा साधा निषेध करण्याचे धाडसही मंत्रिमंडळातल्या कोणत्याही मंत्र्याने दाखवलेलं नाही. याचे कारण उघड आहे. बिहार आणि झारखंडच्या निवडणुका तोंडावर आहेत.अशा परिस्थीतीमध्ये हिंदी करता झगडणा-या (!!!) या मुस्लिम नेत्याला विरोध करणे काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही.


सलग तीन विधानसभा निवडणुका जिंकल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा अहंगंड सध्या कमालीचा वाढलाय. दुर्दैवाने भाजप- शिवसेना युतीमध्ये सध्या सुतकी वातावरण आहे. ही पोकळी भरुन काढण्याचे काम राज ठाकरेंची मनसे करतेय. ( ही पोकळी भरुन काढण्याकरता त्यांचा जो मार्ग आहे..तो अजिबात योग्य नाही ) परंतु अबु आझमी सारख्या नाठाळ व्यक्तीला ताळ्यावर आणण्याकरता मनसेचे आमदार जर काठी उगारणार असतील. तर हे आमदार मला चालतील. त्यांचा यामागचा उद्देश पवित्र नसेल .. किंबहुना तो नाहीच. त्यांना त्यांची मराठीची दुकानदारी भक्कम करायची असेल, शिवसेनेची गोची करायची असेल हे सारे मला पटतंय..समजतंय परंतु महाराष्ट्रला खरा धोका हा अबु आझमीसारख्या धर्मांध शक्तीचा आहे. मनसेच्या काठीने का होईना हा साप ठेचला जात असेल.. तर त्या मारहाणीस माझे समर्थन आहे.

10 comments:

Unknown said...

jai hind!!!!
excellant. This is reality of abu azami. Common man should know all these things.

Keep it up.

Gireesh Mandhale said...

wa. mast ahe! great.

Unknown said...

i do not agree with "manase" reaction in vidhansabha. One can take oath in hindi. as it is national language. National things are more important than regional.

this is politics because the oath is taken by person called " abu aazami?

santosh gore said...

असल्या माथाळांच्या माथी काठीच हाणण्याची गरज आहे. अबु आझमीच्या ऐवजी 1993 च्या बॉम्बस्फोटात जर एखादा हिंदू असता तर तो निर्दोष सुटू शकला असता का ? किंव निर्दोष सुटला असता तरी नागरिकांनी त्याला निवडून दिलं असतं का ? अर्थातच नाही. मात्र अबुला फक्त मुस्लिम आहे म्हणून निवडून देणार भिवंडी आणि मानखुर्दमधील काय धार्जिणे आहेत ? हे काही वेगळं सांगण्याची गरज नसावी.

Priyanka Deshpande said...

I agree with u Onkar... gud article... keep it up...

Shrijeet said...

hi,
article is good but somewhere it is dispenced with your your motive.let me tell you why,your article is been written from the bjp angle and mns action is completely based on lingustic agenda.now as u said 'abu azmichi masti utarvali geli' this is partially true because

1)abu azmi is a person who will capitalise on this issue and it will help him to garner more votes in his favour.

2)mns agenda is based on language and not on religion now abu azmi will use this new language trump card to create disaffection between two communities and his agenda is simple oppose mns by using constitution as a springboard. more and more mns will fight for language oppose them by saying our constitution says different so everybody(non-marathi)including legal machinary in india will stand to condemn mns.

3)everybody in maharashtra knows it now forthwith this paltry politics will not going to work thats why raj thakre type of politics is dying soon and therefore majority of marathi voters are also condemning this 'raj neeti'

4)this attempt to bit mr.azmi will have severe consequences on marathi people living in other states.

5)afterall no politician is going to suffer but a commonman and therefor mns should not indulge in not constitutional means to teach lessons to anybody

Shirish Garje said...

i agree with u... pan mns la support na karanyache detailing karaves aase mala vatate...

bhakti bisure said...

good one......... kharach.......!!!! ase lok aple pratinidhi mhanun nivadun jatat..... this is really frustrating some times......!!!!

Unknown said...

I agree with you,onkar.
abu azami shows his arrogance & still 'sattadhari' kept mum.
thats why i also support manase.Manisha

THANTHANPAL said...

मेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला नदे
राज वर खटला भरण्या पेक्षा बिमार उत्तर भारतातील राजकारण्यावर खटले भरावेत
हिंदी ही कायद्याने भारताची राज्यभाषा नाही. तर ती फक्त सरकारी कामकाजची कार्यालयीन भाषा आहे. ते अफीशियल लॅंग्वेजस आक्ट, 1963 भारत सरकार च्या कायद्यात स्पष्ट केले आहे. केवळ उत्तर भारतात ही भाषा बोलल्या जाते. भारताच्या लोकसंख्ये पेकी फक्त ४०%लोकच ही भाषा बोलतात. तसेच कोर्टात हिंदी मजकूरात त्रुटी असतील तर इंग्रजी मजकूर मान्य केला जातो.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...